‘अनुनाद’ हे पुस्तक वाचताना खोपकरांचा कलाक्षेत्राविषयीचा व्यासंग लक्षात येतो. आणि त्यांच्या कलासक्त जीवनाचा आवाका चकित करतो!
खोपकरांनी चित्रकला, सिनेमा, संगीत, पुस्तके अशा विविध कलांचा मनसोक्त आस्वाद घेतला आहे. प्रस्तुत पुस्तकात कलाक्षेत्रातले अनुभव, भेटलेली माणसे, त्यांच्याबद्दल वाटणारा आदरभाव, या गोष्टी त्यांनी व्यक्त केल्या आहेत. ही व्यक्तिमत्त्वे नादिष्ट आहेत, आपल्या ध्येयाने झपाटलेली आहेत. म्हणून ती प्रेरणादायीही आहेत. या पुस्तकातील लेख ‘शब्द’, ‘शब्दचित्रे’ आणि ‘अनुनाद’ अशा तीन भागांत विभागले आहेत.......